राज्यात ६ कलाकारांच्या आत्महत्या…
पुणे-नृत्य कलावंत असलेल्या तरूणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हडपसर भागातील गोंधळेनगर भागात मंगळवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. विशाखा काळे (वय २४, रा. नटराज कॉलनी, गोंधळे नगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.आत्महत्येमागील नेमके कारण पोलिस शोधत आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून काळे लावणी सादर केली आहे. कोरोना काळात हातात कुठलंच काम नसल्याचे अनेक कलाकारांची घरची परिस्थिती हलाखीची बनली आहे. अनेक लोककलावंतांची हीच हालत असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. आतापर्यंत राज्यात ६ कलाकारांनी आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा या नृत्य कलावंत होत्या. विविध कलावंत संघटनाच्या त्या सदस्या होत्या.त्या आई-वडिल आणि बहिणीसह गोंधळे नगर भागात राहत होत्या. विशाखा आणि त्यांची बहिण इव्हेंट मॅनेजमेंट आणि नृत्याचे कार्यक्रम करीत असत. दरम्यान, विशाखा यांचा गतवर्षी नोंव्हेंबर महिन्यात अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे त्या मागील काही महिन्यापासून नैराश्यात होत्या. दरम्यान, विशाखा यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दि. ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीच्या कुटुंबियांना तीने आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कुटुंबियांनी हडपसर पोलिसांना दिली.