पुणे-आज सकाळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट कलावंतांनी घेतली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फर रिलीफ फंडातून तमाशा कलावंतासाठी एक कोटी आर्थिक मदत देण्याची शरद पवार यांनी सांगितले तसेच १ फेब्रुवारीपासून तमाशाला सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी सूचना केली . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तमाशा आणि अन्य कलावंतांचे कार्यक्रम सुरू करण्यास अडचण नाही असे स्पष्ट केले.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही यास संमती दिली आहे . अशी माहिती आमदार अतुल बेनके आणि कलावंत रघुवीर खेडकर यांनी येथे दिली.