आर आर आर च्या टीम ने पुण्यात उभारला भव्य सेट .
एस. एस. राजमौली हे आपल्या भव्य सेट साठी ओळखले जातात काही दिवसांपूर्वी त्यांनी आगामी सिनेमा आरआरआरची घोषणा केली आणि त्यांच्या फॅन्सना या सिनेमाची उत्सुकता लागली.
या सिनेमात सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण आलिया भट्ट आणि अजय देवगण यात लीड रोलमध्ये आहे.
आरआरआरचे हैदराबादमध्ये शूटिंगचे पहिले शेड्यूल संपले आहे आणि आता संपूर्ण स्टारकास्ट पुण्यात दुसऱ्या शेडूल शूट करणार आहे ज्या साठी पुण्यात भव्य सेट उभारला जातो आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आलिया भटसह सिनेमाची टीम पुण्यात शूट करणार आहे. 30 जुलै 2020 आरआरआर रिलीज होणार आहे.