mymarathi.net पुणे- मराठी सिने नाट्यसृष्टीतील कलावंतांच्या समस्या आर्थिक विवंचना आहे तिथेच आहेत ,पूर्वापार त्या तशाच आहेत ,खरेतर या समस्या सोडवायला पुढाकार घेऊन असे कोणी पुढे आलेलेच नाही अशी खंत व्यक्त करीत आपण आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्याला या समस्या ,विवंचनेतून कलावंत तंत्रज्ञ आदी या सृष्टीतील प्रत्येकाला कसे बाहेर काढता येईल सिने नाट्य सृष्टी कशी सशक्त करता येईल या आव्हानाला तोंड द्यायचे असून आपण आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम करणार असल्याचे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज पुणे महापालिकेत आल्यावर ‘माय मराठी’ शी बोलताना सांगितले .विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी प्रिया आणि त्यांचा सुपुत्र अभिनेता अभिनय यांचे स्वागत केले . यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष बाबा पाटील उपस्थित होते. पहा आणि ऐका यावेळी नेमके प्रिया बेर्डे यांनी काय म्हटले आहे …