ठाणे
नटवर्य श्री केशवराव माेरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिष्य मंडळीकडून सुरू करण्यात आलेल्या केशवराव माेरे फाऊंडेशन यांच्या वतीने यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घाेषणा करण्यात आली. यामध्ये केशवराव माेरे पुरस्काराचे मानकरी यंदा ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक श्री. माेहन साटम ठरले आहे. तसेच लक्षवेधी पुरस्काराचा बहुमान अभिनेत्री श्रीमती आशा ज्ञाते यांना जाहीर झाला आहे. याशिवाय पडद्यामागील कलाकार श्री एकनाथ तळगांवकर यांना दुसरा लक्षवेधी पुरस्कार जाहीर झाला आहे.येत्या बुधवारी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे या पुरस्कार वितरण साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले. या फांऊडेशनच्या वतीने प्रथमच एकपात्री स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. याची पहिली फेरी साेमवारीपासून सुरू झाली. उद्या बुधवारपर्यंत हे चालणार आहे. १५ मार्च राेजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. अष्टविनायक नाट्य संस्थेचे प्रमुख दिलीप जाधव हे या साेहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहे.