महेश सोनावणे यांची प्रसिध्दी प्रमुख पदी निवड
पुणे-नृत्य परिषद महाराष्ट्र यांच्या विद्यमाने जागतिक रंगभूमी दिनाचा कार्यक्रम सर्व नियम पाळून जलमंदिर पॅलेस सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते श्री नटराज मूर्तीचे पूजन करून झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार महाराष्ट्र कार्यकारिणी उपाध्यक्ष रत्नाकर शेळके आणि महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य जतिन पांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री पंकज चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे, उपस्थित होते. नृत्य परिषद सातारा प्रसिध्दी प्रमुख म्हणून महेश सोनावणे यांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नृत्य परिषद करत असलेल्या उत्तम कार्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराजांनी कौतुक केले व नृत्य परिषदेच्या सतत मी पाठीशी आहे तुम्ही उत्तम काम करत रहा असा पाठींबा महाराजांनी दिल्यामुळे सर्वजण भाऊक झाले. यावेळी नृत्य परिषद सातारा शाखेतील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना महाराजांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.