स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा सत्यजित रायच्या गॅलरीचे प्रदर्शन तसेच सत्यजित राय यांच्या चित्रपटांचे आणि त्यांच्यावर आधारित चित्रपटांचे स्क्रीनिंग योजणार आहे.
मुंबई – सत्यजित राय यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या महान दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध उपक्रम योजले आहेत. नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, मुंबईने तीन दिवासीय चिटपट महोत्सवाचे आयोजन केले असून भारतातील विविध ठिकाणी त्यांच्या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. सत्यजित राय यांच्या चित्रपटांचे आणि त्यांच्यावरील चित्रपटांचे स्क्रीनिंग 2, 3 आणि 4 मे 2022 रोजी नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूर आणि पुणे येथे योजण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी ही स्क्रीनिंग निःशुल्क आहेत. या आयोजनामुळे प्रेक्षकांना सत्यजित राय यांचे गाजलेले चित्रपट मोठ्या पडद्यावर बघायला मिळतील आणि त्यांच्या जीवनावर आधारित फिल्म्समधून सत्यजित राय यांच्या जीवनाचा आढावा देखील घेता येईल.
नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, मुंबई हे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फिल्म्स डिव्हिजन, नॅशनल फिल्म आर्काईव्ह्ज् ऑफ इंडिया आणि दूरदर्शन यांच्या सहयोगाने तसेच पश्चिम बंगाल सरकार आणि ऑरोरा फिल्म कॉर्पोरेशन आणि फ्रेंड्स कम्युनिकेशन यांच्या साहाय्याने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत आहे. सत्यजित राय चित्रपट महोत्सवाची सुरुवात 2 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता रेड कार्पेटने आणि अनेक सन्मान प्राप्त श्री. श्याम बेनेगल यांच्या हस्ते सत्यजित राय यांच्या अर्ध-स्थायी गॅलरीच्या उद्घाटनाने होईल आणि त्यानंतर ‘अपराजितो’ या फिल्मचे स्क्रीनिंग होईल. हा या फिल्मचा ‘इंडिया प्रिमियर’ असेल. या चित्रपटाची निर्मिती श्री. फिरदौसुल हसन यांनी केली असून श्री. अनिक दत्ता यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या पथेर पांचालीच्या निर्मितीवरून प्रेरित आहे. दिनांक 4 मे 2022 रोजी पथेर पांचाली (सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट) च्या स्क्रीनिंगनंतर दुपारी 4 वाजता एका पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवातील शेवटचे स्क्रीनिंग असेल. ही पॅनल चर्चा NFDC च्या अधिकृत फेसबुकवर सर्व प्रेक्षकांसाठी, विशेषतः चित्रपट रसिकांसाठी आणि सत्यजित राय यांच्या चित्रपटांच्या भोक्त्यांसाठी लाईव्ह असेल. या चर्चेत सहभागी होतील श्री. श्याम बेनेगल, श्री. बरूण चंदा (राय यांच्या सीमाबद्ध चित्रपटातील अभिनेता) आणि श्री. शांतनू मोईत्रा. या चर्चेचे संचालन करतील श्री. शंखायन घोष.
NFDC इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंदर भाकर म्हणाले, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सत्यजित राय यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना आणि या महान चित्रपट दिग्दर्शकाला श्रद्धांजली देताना नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे एका खास गॅलरीचे उद्घाटन करताना आम्ही गौरव अनुभवत आहोत. लोकांनी राय यांचे चित्रपट या ना त्या रूपात पाहिले आहेतच, पण यावेळी आम्ही राय यांच्या चाहत्यांना 2 मे ते 4 मे दरम्यान दिल्ली, मुंबई, चेन्नई कोलकाता, बंगळूर आणि पुणे येथे काही निवडक चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यांवर त्यांचे काही निवडक चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित करत आहोत. NFAI द्वारा अलीकडेच रिस्टोर करण्यात आलेले काही चित्रपट म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असेल.
अपराजितोच्या प्रिमियर बरोबरच जे इतर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत, ते आहेत- NFDC चा आगंतुक, घरे बाइरे, गणशत्रू हे सत्यजित राय दिग्दर्शित चित्रपट, उत्पलेंदू चक्रवर्ती दिग्दर्शित म्युझिक ऑफ सत्यजित राय, अनिर्बन मित्रा आणि तीर्थ दसगुप्ताद्वारा दिग्दर्शित नेमाई घोष – ए रे ऑफ लाइट, फिल्म डिव्हिजनचे माहितीपट, सत्यजित राय द्वारा दिग्दर्शित लघुपट इनर आय, रविंद्रनाथ टागोर, श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘सत्यजित राय’, बी. डी. गर्ग दिग्दर्शित क्रिएटिव्ह आर्टिस्ट्स ऑफ इंडिया – सत्यजित राय, NFAI च्या फीचर फिल्म्स- सोनार केला, सीमाबद्ध, हिरक राजार देशे, ज्या सर्व सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केल्या आहेत, दूरदर्शनवरील सत्यजित राय दिग्दर्शित ‘सद्गती’, पश्चिम बंगाल सरकारचे ‘पथेर पांचाली’ तसेच सत्यजित राय दिग्दर्शित आणि स्वतंत्र चित्रपटकर्मींद्वारा निर्मित ‘अपराजितो’ आणि ‘जलसाघर’.