पुणे, दि.17 जून : ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी पुण्यातील राहुल शर्मा यांची निवड झाली आहे. ही निवड पुढील पाच वर्षांसाठी असून या काळात चित्रपट क्षेत्रातील सर्व महत्वाच्या समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुल शर्मा यांनी सांगितले. कोरोना काळात शुटींग बंद राहिल्याने अनेक कामगार व कलाकारांचे प्रश्न समोर आले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात अगोदर प्राधान्य देणार आहोत. या नियुक्तीबद्दल राहुल शर्मा यांनी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गुप्ता व सचिव तेजिंदर सिंग अहलुवालिया यांचे आभार मानले आहेत.