‘तू सौभाग्यवती हो’ विवाह सप्ताह – १ जूनपासून संध्या. ७ वा.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात ऐश्वर्या आणि सूर्यभान हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.
पण सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? आणि त्याची मुलं तिला आपली आई मानतील का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.