पुणे-ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराची जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा निर्णय घेतला. आज या जागेची बाजार भावानुसार किंमत जवळपास अडीच कोटी रुपये इतकी आहे. या जागेवर ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंतांना आसरा मिळावा म्हणून मोफत निवारा देण्यात यावा म्हणून हा निर्णय विक्रम गोखले यांनी घेतल्याचे वृत्त आहे .याचसाठी त्यांनी ही पूर्ण जमिन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली. अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभे करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. विक्रम गोखल्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्य दलाला मदत म्हणून देत असत.विक्रम यांनीही वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे सुरू ठेवला असून दरवर्षी विक्रम गोखलेही त्यांच्या कमाईतील रक्कम मदत म्हणून देत असतात. दरम्यान, कोरोना व्हायरस या महामारीशी सामना करण्यासाठी अनेक कलाकार आपआपल्या परिने मदत करत आहेत. च्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रमजींनी स्वतः मदत तर केलीच शिवाय बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.आतापर्यंत विक्रमजींनी ज्येष्ठ कलावंतांची होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.