पुणे- भूक लागली, संत्याने (अभिनेता संतोष जुवेकर) जोगेश्वरी बोळात वडापाव खाल्ला ,
मंडई मध्ये बंदुकीने फुगे फोडले …
मध्येच मिनरल वॉटर च्या बाटल्या घेत पाण्याने तहान भागविली आणि चेहरा स्वछ केला …
एक रात्र हजारो भाविकांनी संत्या च्या या अदाकारीबरोबर गणेश उत्सवात गणेश दर्शनासह एन्जॉय केला .महिला पोलिसांसह , तरुणाई , कित्येक ठिकाणी वाहिनी काकू , लहान बालकांनी ‘ बायकर्स अड्डा ‘ च्या कलावंतासमवेत धमाल केली .
हि धमाल करीत असताना संतोष जुवेकर ने , तुळशीबाग गणपती , कसबा गणपती , गुरुजी तालीम , अशा अनेक ठिकाणी गणेश मंडळे , कार्यकर्ते , भाविक यांना दुष्काळग्रस्तांची आठवण ठेवा , मिरवणुकीत अचकट विचकट गाण्याना फाटा देत , गणेश भक्तीची धूम माजविणारी गाणी लावा , गैरप्रकारांना आळा घाला अशी आवाहने केली आणि
‘ बायकर्स अड्डा ‘ या सिनेमाच्या वतीने मनाचा पहिला गणपती कसबा गणपती येथे दुष्काळ ग्रस्तांसाठी आर्थिक मदत हि रोख स्वरुपात दिली
मराठी कलाकारांचा करिष्मा काय आहे ? रसिक आणि गणेश भाविकांच्या मनात कलाकारांच्या बद्दल किती आकर्षण आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी अचंबित करणारी अनुभूती ‘ बायकर्स अड्डा ‘ या आगामी मराठी सिनेमाच्या ‘संतोष जुवेकर , तन्वी किशोर , देवेंद्र भगत , अनिरुद्ध हरीप , राहुलराज डोंगरे, ऋषी मांडके आदी कलावंतांनी रात्री जेव्हा गणेश उत्सवात गणेश दर्शनासाठी सर्वत्र पायी फिरत रात्र जागविली तेव्हा आली .
बायकर्स अड्डा ‘चे निर्माते विजय हरिया , प्रमोद लोखंडे, दिग्दर्शक राजेश लाटकर त्यांच्या समवेत होते . अखिल मंडई मंडळ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,निंबाळकर तालीम मंडळ , मनाचे तुळशीबाग गणपती , गुरुजी तालीम गणपती , तांबडी जोगेश्वरी गणपती , कसबा गणपती , आदी मंडळांना कलावंतांच्या या टीम ने भेटी दिल्या गणपतीची आरती केली आणि भाविकांशी संवाद साधला . यावेळी भाविकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सारे कलावंत हि भारावून गेले होते