मालाड येथील इनॉबिर्ट मॉलमध्ये संजयजाधव यांच्या आगामी ‘तू ही रे ‘सिनेमाचं ट्रेलर लॉच करण्यात आला. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार,गिरीश ओक अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा लव्ह स्टोरी एका वेगळ्यारुपात पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे. आदर्श शिंदे, अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर यांनी सिनेमाची गाणी तर गायली आहेत. सिनेमाची कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे.प्रसाद भेंडे यांचे छायाचित्रण या सिनेमात दिसणार आहे. करण एंटरटेनमेंटचे मृदुलापडवळ- ओझा, शीतल कुंमार-मानेरे, इंडियन फिल्म्स स्टूडिओचे आशिष वाघ आणि उत्पल आचार्य तसेच ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेवेनचे दिपक राणे यांच्यासह संजय घोडावत हे सहनिर्माते या सिनेमासाठी एकत्र आले आहेत. तू हि रे हा सिनेमा ४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे