पुणे : यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्यावतीने संस्थेच्या शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी स्किल सेंटर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण देशवासीयांना होत राहावे यासाठी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील विविध राजे महाराजांची सुमारे पाचशेहुन जास्त संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करण्याचे प्रचंड मोठे कार्य सरदार वल्ल्भभाई पटेल यांनी केले, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्याविषयी अपार आदर आणि कृतज्ञता आहे असे मत यावेळी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकतेची सामुहीक शपथ घेतली.