पुणे : असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कुल्स (एम्स) व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस)च्यावतीने ‘व्यवस्थापनातील सध्याच्या घडामोडी – बदल आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. पुणे येथील शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात दोन दिवस चाललेल्या या परिसंवादात त्रेचाळीस जणांनी आपले संशोधन निबंध सादर केले.
तर परिसंवादाच्या समारोप सत्रात झील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या संचालिका डॉ. इंदू शर्मा, ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ् सल्लागार डॉ. विराज अत्रे, आर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया लि. कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे मुख्य व्यवस्थापक मुकुंद जागीरदार यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस)च्या विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. वंदना मोहांती यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस)चे अधिष्ठाताडॉ.राजेंद्र सबनीस,वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संसंस्थेचे प्राध्यापक वाय. एस. पाटील, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे प्राध्यापक डॉ. विलास ढोले यांच्यासह पुणे शहर परिसरातील वीसहुन अधिक व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रा.सारंग दाणी, डॉ.अमित गिरी, डॉ. पुष्पराज वाघ,आदिती चिपळूणकर,योगेश निकम,निसार खान, प्रा.महेश महांकाळ, पवन शर्मा, डॉ. सुनीता पाटील, अंजली धकाते, हर्षा पटेल, मेघा बोरकर आदींनी विशेष सहकार्य केले.