पुणे-; कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी नवी पेठ, राजेंद्रनगर परिसरामध्ये पदयात्रा काढली. त्यामध्ये आघाडीतील ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.या पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
महापालिका कर्मचारी वसाहती,राजेंद्रनगर ,दत्तवाडी परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी,पुनर्वसन अशा समस्या यातून लवकरात लवकर मार्ग निघून सुटका व्हावी .अशी नागरिकांची मागणीअसून.या मागण्या सुटण्यासाठी प्राधान्याने लक्ष घालणार आहे असे कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले .
या पदयात्रे मध्ये अंकुश काकडे ,अभय छाजेड, शाम मानकर ,रोहित टिळक ,गोपाल तिवारी,रविंद्र धंगेकर , कमलताई व्यवहारे, अजित दरेकर, विनायक हनमघर,दत्ता सागरे, सुधीर काळे, काका धर्मावत ,दिलीप ढवळे,बाळासाहेब दाभेकर, गणेश नलावडे,सचिन आडेकर,अनिल साप्ते,नदीम पटेल,अनंत गांजवे,अप्पा जाधव ,राजेंद्र इंदुलकर,अजित पोटे, राजू नाणेकर,नरेश पावटेकर,किरण दोशी,नीता रजपूत,अंजली सोलापुरे,मनीषा दळवी,शैलजा टेंबे ,सुमन भोईने,करुणा कुंभारे आदी सहभागी झाले होते.
पदयात्रेमध्ये सौ .कल्पना अरविंद शिंदे सहभागी झाल्या होत्या. सौ कल्पना शिंदे यांनी महिला कार्यकत्यांना घेऊन घरोघर जाऊन प्रचार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नारायण पेठ,सदाशिव पेठ,शनिवारपेठ,नवी पेठ,राजेंद्रनगर,दत्तवाडी ,दांडेकर पूल या परिसरात पदयात्रा काढून अरविंद शिंदे यांनी मतदारांशी संपर्क साधला. राजेंद्रनगर ,दत्तवाडी भागात पाण्याची समस्या महिलांनी अतिशय तीव्रपणे मांडली ,त्यांचे म्हणणे शिंदे यांनी समजावून घेतले.आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतु तुम्ही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, समजून घेतले या बद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले आणि हा प्रश्न आपणच सोडवावा, अशी विनंती महिलांनी केली. या परिसरात एसआरएचे प्रश्न पुनर्वसनाचे, प्रश्न लोकांनी शिंदे यांच्या समोर मांडले पालिका कर्मचारीवर्गाने त्यांच्या वसाहतींचे फेरबांधणी मालकी हक्क आदि मागण्या शिंदे यांना सांगितल्या. वारसा हक्काने नोकरी लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे लक्षात घेऊन घरे मालकी हक्काची करावीत असे रहिवाश्यांनी सुचवले या वर शिंदे यांनी सहमती दर्शवली.
“यहोवा सिदकेनु ख्रिस्ती” संघटनेने अरविंद शिंदे यांना पाठींबा जाहीर केला.संघटनेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण ,उपाध्यक्ष मिलिंद मोरे यांनी पाठिंबयाचे पत्र शिंदे यांना दिले