|
|
वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ – आमदार जगदिश मुळीक
वडगाव शेरी ःवडगाव शेरी मतदार संघामध्ये नागरीकांना चांगले आरोग्य मिळावे. बाल गोपाळांना खेळण्याचे हक्काचे ठिकाण देण्याकरिता लोकसंख्या नुसार उद्यान करण्याचे नियोजन केले आहे. वडगाव शेरी साठी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्कृष्ठ उद्यानआहे. या उद्यानामध्ये बुलेट ट्रेन, म्युजिकल कारंजे,आंतरराष्ट्रीय दर्जाचे अक्युपेशन ट्रक, ओपन जीम, ऑक्सिजन कॉर्नर,आणि लहान मुलांसाठी विविध खेळणे आहे. या सुविधांमुळे उद्यानात सकाळी व संध्याकाळी मोठया प्रमाणात गर्दी असल्याची माहिती आमदार जगदिश मुळीक यांनी दिली
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांची प्रचार फेरी आज गांधीनगर, म.हो. बोर्ड या ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक बापुसाहेब कर्ण गुरूजी, अॅड अविनाश साळवे, राहुल भंडारी, नगरसेविका शितल सावंत, श्र्वेता गलांडे, मुक्ता जगताप, माजी नगरसेवनक भगवान जाधव, भीमराव खरात, नौशाद शेख, नामदेव घाडगे, राजू बाफना, संतोष सुकाळे, विशाल साळी आणि आशा जगताप आदी मान्यवर होते. यावेळी मुळीक म्हणाले की, राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्याना प्रमाणे विश्रांतवाडीत पाम उद्यान, वडगाव शिंदे येथे वन पर्यटन केंद्र, खराडीमध्ये बोलोद्यान उद्यान सुरू करण्यात आले आहे. वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक परिसरामध्ये सुविधायुक्त उद्यान केले. कल्याणीनगर, गणेशनगर, विमाननगर, सोपाननगर, बॉम्बे सॅपर्स, चंदननगर, मैत्री उद्यान, जैव वैविध उदयान, मारूतीनगर, नगररोड, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, येरवडा या उद्यानात विविध काम करण्यात आली आहेत. सुरक्षितेच्या दुष्टीने उद्यानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत. या उद्यानामध्ये विविध प्रकारची वृक्ष आहेत. गेल्या पाच वर्षात वडगावशेरी मध्ये हजारो वृक्षांची लागवड केली आहे. हजारो वृक्षांची लागवड करून मतदार संघ हरित केला