पुणे : पूर्वी 2 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यावेळीही आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. 36, 767 मतांनी त्यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पराभूत केले आहे. मिसाळ यांना 97, 012 मतं मिळाली, तर कदम यांना 60, 245 मतं मिळाली आहेत.
काँग्रेसचे आबा बागुल या मतदार संघातुन इच्छुक होते, उमेदवारी न मिळाल्या ने त्यांनी बंडखोरी केली होती, पण ऐन वेळी त्यांनी माघार घेतली.त्यामुळेच भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांच्यात पर्वती मतदारसंघात सरळ लढत झाली .