वडगाव शेरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीला खिंडार ..
वडगाव शेरी –विधानसभा निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनिल(पप्पू )गोगले आणि किशोर विटकर यांनी कार्यकत्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. भाजपच्या चाणक्यांने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आणण्यामध्ये यशस्वी होत आहे. या रणनितीचा फायदा भाजपला विधानसभा निवडणूकीमध्ये नक्की होणार आहे. मेगा भरती आणि मिळणा-या प्रतिसादामुळे विजय नश्चित असल्याचा दावा भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी करत आहे.
वडगावशेरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनिल(पप्पू )गोगले आणि किशोर विटकर यांच्या सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित गंगावने, राकेश मोहिते, शैलेश घाडगे संजय शिर्के, प्रविण कणघरे, अश्विन कुमार गायकवाड, चेतन चव्हाण आणि प्रशांत धिवार यांनी आज आमदार जगदिश मुळीक यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाबद्दल आमदार जगदिश मुळीक म्हणाले की, वडगावशेरी मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये भाजप पक्ष खुप वाढला आहे. या वडगावशेरी मतदार संघामध्ये सर्वाधिक ताकद ही भाजप पक्षाची आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास सहा हजार कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदार संघामध्ये ४० हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. मतदार संघामध्ये भाजपचे 14 नगरसेवक आहेत. शिवसेनाचे तीन नगरसेवक आहे. वडगावशेरी हा भाजप चा बालेकिल्ला आहे.
२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणूकामध्ये वडगावशेरी मतदार संघामधून भाजपला सव्वा लाखां पर्यंत मतदान झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणूकामध्ये आमदार जगदिश मुळीक निवडणूक आले. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये ४०० बुथपैकी ९१ बुथवर ४० टक्क्यापेक्षा जास्त मतदान भाजपला झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४४० बुथ पैकी ३२७ बुथवर भाजपला ५० टक्क्यापेक्षा मतदान झाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकापासून भाजपच्या मतदानाचा टक्का वाढतच चालला आहे.