आम आदमी पक्षाचा पर्वती साठी जाहीरनामा प्रसिद्ध
पुणे:सर्वाधिक वर्दळीच्या स्वारगेट – सातारा रस्ता मार्गिकेवर मेट्रो प्रकल्प आखताना अन्याय झालेला आहे. डी पी आर मंजूर नाही. यासंदर्भात सत्ताधारी भाजपा -शिवसेनेकडून काहीही काम झाले नाही, अशी टीका आम आदमी पक्ष पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनावणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.पर्वती विधानसभा मतदार संघासाठी आम आदमी पक्षाने तयार केलेल्या जाहीरनाम्याबाबत माहिती देण्यासाठी संदीप सोनवणे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती .या जाहीरनाम्यात त्यांनी पायाभूत सुविधेला प्राधान्य ,दिल्लीच्या ‘आप’ मॉडेल नुसार दर्जेदार सरकारी शाळा ,’आरोग्य सेवा हक्क कायदा ‘,महिला सुरक्षेसाठी १० हजार सीसीटीव्ही जाळ्याची उभारणी ,युवकांना रोजगार संधी, लोकसहभागातून शाश्वत विकास,विकेंद्रित कचरा व्यवस्थापन ,टेकड्या -नद्या -नाले यांच्यावरील अतिक्रमणे हटवणे ,टँकर माफियांना लगाम घालून समान दाबाने पाणीपुरवठा आणि आमदार निधी खर्च करताना जनतेचे प्राधान्यक्रम -मत जाणून घेण्याचे मुद्दे मांडले आहेत .
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज संदीप सोनावणे यांनी पर्वती विधानसभा मतदार संघासाठीच्या जाहीरनाम्याची माहिती दिली. यावेळी इंद्रजित सदलगे ,प्रणित तावरे, सागर फाटक, सुभाष कारंडे याेगेश इंगळे, मोहनसिंग रजपूत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदार संघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन दिले होते.ते आश्वासन कधीही पूर्ण झाले नाही . त्यासाठी निवडलेल्या लक्ष्मीनगर, बिबवेवाडी येथील जागा खासगी विकासकांच्या ताब्यात गेल्या आहेत. मित्र मंडळ चौकातील जिजामाता प्रसूती गृह हे हॉस्पिटल सत्ताधाऱ्यांकडून नीट चालवले जात नाही ,असे आरोप संदीप सोनवणे यांनी केले .स्वच्ह आणि प्रामाणिक राजकारण करून आम आदमी पक्षाने दिल्लीत परिवर्तन करून दाखवले आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी या प्रामाणिकपणाला साथ द्यावी ,असे आवाहन इंद्र नील सदलगे यांनी यावेळी बोलताना केले.जनतेच्या लोक वर्गणीतून आपण निवडणूक लढवीत आहोत .