नागरीकांना नाहक त्रास देणा-यांना मतदार माफ करणार नाही -आमदार मुळीक
वडगाव शेरी :
लोहगाव आणि इतर ठिकाणी सर्व सामान्य नागरीकांनी व्यवसाय आणि घराचे बांधकाम सुरू केल्यानंतर त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार केला जात आहे. गरीब नागरीकांना सन्मानाने जगण्याचे अधिकार आहे. गरीबांना चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. या गरीबांना त्रास देणा-यांना मतदार माफ करणार नाही असे मत भाजप महायुतीचे आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांची प्रचार फेरी आज वडगाव शेरी , साईनाथ नगर, राघोबा पाटील नगर, वृंदावन नगर आणि गलांडे वस्ती या ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, , नगरसेविका सुनिता गलांडे, नगरसेवक संदिप ज-्हाड, नगरसेविका शितल शिंदे, साधना भगत, सुधीर गलांडे तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुळीक म्हणाले की, गरीबांना व्यवसाय करण्याचा आणि घर बांधण्याचा अधिकार आहे. अनेक जण कर्ज काढून घर बांधण्यासाठी काढतात. पोटाला चिमटा काढून व्यवसाय सुरू करतात. अशा नागरीकांना त्रास देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या गरीबाची भाकरी चोरणा-यांना त्यांची जागा दाखवणे गरजेच आहे. त्रास देणा-याच्या विरोधात नागरीकांनी आवाज उठवला पाहिजे. विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला भरघोस मतदान करून विरोधकाना त्यांची जागा दाखवा. वडगावशेरी मतदार संघाच्या विकास करण्यासाठी कोटयावधीचा निधी आणला आहे. या निधीतून अनेक काम केली आहेत. लोहगाव साठी २६ रस्ते व विविध विकास कामाचा शुभारंभ झाला आहे. सततच्या पावसामुळे विकास काम थांबली आहेत. पाऊस बंद झाल्यानंतर ही कामे सुरू होतील. विरोधक केवळ रस्त्यांच्या अवस्थेचे जुने फोटो सोशल मिडियावर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मतदार त्यांच्या खोट्या जाहिरात बाजीला फसणार नाही. पारदर्शक कारभार करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या सोबत कायम रहातील व आपल्याला पुन्हा संधी देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.