पुणे- अजगराप्रमाणे शहर वाढले पालिकेच्या हद्दीबाहेर तर बकाल पणा वाढलाच पण उपनगरे स्मार्ट करण्याचे धोरण राबविता राबविता ,मूळ पुण्याकडे मात्र साऱ्यांनी दुर्लक्ष केले ,ज्या मूळ पुण्याच्या जीवावर आपण मोठे झालो त्या पुण्याला ,पुणेकरांना ओळख देण्याची गरज वाटत नाही एवढी ‘मोठ्ठी’ माणसे ‘ती’आहेत. त्यामुळे आपल्या पेठेतील माणसांना ती विसरली ,त्यांच्या समस्यां त्यांना आपल्या -विशेष वाटू लागल्या नाहीत . म्हणूनच कसब्याला आता आपल्यातलाच एक सामान्य पण काम करणारा , आपल्याला आपल्या परिस्थितीला न विसरता , मूळ पुण्याला स्मार्ट बनविणाऱ्या एका आमदाराची गरज आहे हे मला जाणवू लागले आणि म्हणूनच मी पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभा राहिलो .राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार कसब्याला,इथल्या पेठांना आणि पेठांतील रहिवाश्यांना हव्या आहे त्या प्रवर्गात नाही मोडत . पण मी त्यांना जरूर आपला वाटतो आणि वाटेल आणि त्यांच्यातच रमून जुन्या पुण्याला स्मार्ट बनवेल या हेतूनेच हि निवडणूक लढवीत असल्याचे येथील शिवसेनेचे बंडखोर अशी उपाधी लावून प्रचार करीत असलेले अपक्ष उमेदवार ,शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले .