पुणे-सप्टेंबर अखेरी पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पूरपरस्थिती निर्माण झाली होती ज्यामध्ये अनेकांना आपली घरे, जीव, पशुधन गमवावे लागले होते. या अश्या परिस्थितीचे मुख्य कारण बुजवलेले नाले तसेच फार मोठ्या प्रमाणात झालेले कॉंक्रीटीकरण असल्याचे दिसून येते. बिबवेवाडी, सहकारनगर, बाणेर ह्या भागात फार मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थितीला लोकांना सामोरे जावे लागले. स्मार्ट सिटी अंतर्गत विकीसित होत असलेल्या अॅम्युनिटी स्पेस ह्या पर्यावरणपूरक असणे गरजेचे असताना सध्या त्याचे ९०% हून अधिक कॉंक्रीटीकरण होत असताना दिसून येत आहे.
अॅम्युनिटी स्पेसमध्ये गार्डन, प्ले ग्राउंड, अर्बन फॉरेस्ट अथवा पर्यावरणपूरक विकास होणे अपेक्षित आहे सदर विकास करीत असताना पावसाळ्यात जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अबाधित ठेवणे हे महत्त्वाचे असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. दि. २६ डिसेंबर पासून आपल्याला व संबंधित अधिकाऱ्यानं बाणेरमध्ये विकसित होणाऱ्या अॅम्युनिटी स्पेसचे फोटो मी पाठवलेले आहेत – असे कळते कि स्मार्ट सिटी अंतर्गत बाणेर, बालेवाडी भागात असेच २१ अॅम्युनिटी स्पेस “प्लेस मेकिंग” अंतर्गत विकसित होत आहेत/झाले आहेत. हे पर्यावरणाशी सुसंगत नसून त्यामुळे आजूबाजूच्या भागाला पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आघात होण्याची शक्यता आहे.
अॅम्युनिटी स्पेसचा विकास करत असताना लोकांचा सह्भाग घेणे अपेक्षित आहे. तो देखील या विकसामध्ये घेतलेला नाही हे आपल्या निदर्शनास आणू इच्छीते. तरी त्वरित यासंदर्भात बैठक बोलवून यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा.