पुणे -कल्याणी समूहाची प्रमुख कंपनी भारत फोर्ज आणि समूहातील इतर कंपन्यांनी पंतप्रधानांच्या सिटीझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमरजन्सी सिच्युएशन फंडासाठी (पीएमकेयर्स फंड) कोविड- 19 साथीविरोधातील लढ्यासाठी 25 कोटी रुपयांचे योगदान देणार असल्याचे जाहीर केले आहे. निधी देणाऱ्या इतर समूह कंपन्यांमध्ये कल्याणी स्टील, सारलोहा अडव्हान्स्ड मटेरियल प्रा. लि., ऑटोमोटिव्ह अक्सल्स अँड हिकल लि. यांचा समावेश आहे.
भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले, ‘या साथीविरोधात लढण्यासाठी केंद्रीय आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी आमचा समूह बांधील आहे. त्याशिवाय व्हेंटिलेटर्स, रेस्पिरेटरी उपकरणे आणि स्वच्छतेशी संबंधित इतर उपकरणे अशा महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा कमी करण्यासाठी आम्ही आमच्या संशोधन आणि विकास विभागाचा वापर करत आहोत. सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही स्थानिक समाजातील खाद्यपदार्थांची गरज पूर्ण करण्यास सुरुवात केली असून येत्या काही दिवसांत त्यादिशेने आणखी प्रयत्न केले जाणार आहेत.’