पुणे-: जिंजरने पुण्यातील वाकडमधील आपल्या हॉटेलचे नूतनीकरण केले आहे. नव्या, आधुनिक रूपातील जिंजर हॉटेल आपल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. संपूर्णतः नवीन आणि आधुनिक रचना करून ताजी, नवीकोरी ओळख निर्माण करण्याच्या ब्रँड धोरणाला अनुसरून या जिंजर हॉटेलचे रूप देखील पूर्णपणे पालटवण्यात आले आहे.
जिंजरच्या मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीमती दीपिका राव यांनी सांगितले, “पुण्यातील वाकडमधील जिंजर हॉटेलचे नूतनीकरण पूर्ण झाले असून आधुनिक, नव्याकोऱ्या रूपातील जिंजर आपल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या नूतनीकरणामुळे आता हे हॉटेल अतिशय स्टायलिश व अनोखे बनले आहे.”
वाकड येथील नव्या, आधुनिक, स्टायलिश जिंजरमध्ये आकर्षक, मनमोहक, आरामदायी वातावरण निर्माण करण्यात आले आहे. काम आणि आराम यांचा उत्कृष्ट मिलाप याठिकाणी साधला गेला आहे. कायम आठवणीत राहतील असे, मजेशीर, मनोरंजक, इंट्यूटिव्ह आणि स्मार्ट अनुभव मिळवून देणारे डिझाईन ही नव्या जिंजर हॉटेलची खासियत आहे. कॅफे इट कॅटेरा या संपूर्ण दिवसभर सेवा देणाऱ्या खास डायनरमध्ये जागतिक आणि स्थानिक चवींचे अनेक वेगवेगळे पदार्थ उपलब्ध आहेत. पर्सनल वर्कस्टेशन म्हणून देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. याशिवाय फिटनेस सेंटर सारख्या सुविधा याठिकाणी देण्यात आल्या आहेत. मीटिंग रूमची रचना देखील नव्याने करण्यात आली आहे.
जिंजरमध्ये येणाऱ्या, अतिशय वेगवान, कधीही न थांबणारी जीवनशैली असलेल्या पाहुण्यांना साजेशा ऑन-द-गो ब्रेकफास्ट आणि एक्स्प्रेस लॉंड्री सर्व्हिस या सेवादेखील याठिकाणी पुरविण्यात आल्या आहेत. या हॉटेलमधील सार्वजनिक जागा आणि स्पॉट्सची रचना पाहुण्यांना आपापसात भेटणे, बोलणे सहज, मोकळेपणाने करता यावे, एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहोचता यावे अशा पद्धतीने करण्यात आली आहे. सार्वजनिक जागांमधील सुमधुर, ताजेतवाने करणारे संगीत एक आगळेवेगळे वातावरण निर्माण करते.
जोई डिझाईन या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय इंटेरियर डिझायनर्सनी जिंजर ब्रँडचे नवीन डिझाईन तयार केले आहे.
जिंजर हॉटेल्स
द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेली रूट्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी जिंजर हॉटेल्स चालवते. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात क्रांतिकारी संकल्पना घेऊन आलेल्या जिंजर हॉटेलने आपल्या पाहुण्यांना काम आणि आराम या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करण्याची सुविधा उपलब्ध करवून दिली. संपूर्ण देशभरात ४४ शहरांमध्ये त्यांची ६४ हॉटेल्स असून १५ हॉटेल्स तयार होत आहेत. उद्यमशील, व्यावसायिक भारतीयांना त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये देखील आराम आणि सुविधा यांचा उत्तम अनुभव प्रदान करून जिंजर हॉटेल त्यांना नवी ऊर्जा देते.