पुणे- पवार कुटुंबियांमध्ये कौंटुंबीक कलह असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून स्पष्ट केले असताना अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अजितदादांनी स्वगृही परत येण्याचे आवाहन केले आहे.रोहित पवार यांनी फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.
आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,
पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.
लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.