पुणे,दि.2 डिसेंबर 2019: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या उदित गोगोई, चिराग दुहान यांनी तर, मुलींच्या गटात वैष्णवी आडकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चिराग दुहन याने चौथ्या मानांकित उदयवीर सिंगचा 6-3, 6-7(3), 6-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. हरयाणाच्या उदित गोगोई याने सहाव्या मानांकित रोमानियाच्या ड्रॅगोस पेट्री पोपेंगाचा 6-1, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या व वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकर हिने पाचव्या मानांकित व तैपेईच्या यु-युन ली हिला कडवी झुंज देत 6-2, 4-6, 7-6(5) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.चीनच्या जिऑन झुई हिने क्वालिफायर रेश्मा मारूरीचे आव्हान 7-5, 6-3 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचे उदघाटन विलास जावडेकर, डॉ.जयदीप दाते, डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे आणि एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, प्रमोद बाकरे, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, समीर केंकरे, नितीन रानडे, प्रीतम गोयल, सुशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
पेटॉर्न हंचायकुल(थायलंड)(1)वि.वि. निशांत दबस(भारत)6-1, 6-1;
अखिलेन्द्रन इंद्रबालन(भारत)वि.वि.निखिल निरंजन(यूएसए)7-6(5), 6-3;
सुशांत दबस(भारत)वि.वि.जैषवीण सिदना(भारत)4-6, 7-5, 6-2;
चिराग दुहान(भारत)वि.वि.उदयवीर सिंग(भारत)(4)6-3, 6-7(3), 6-1;
उदित गोगोई(भारत)वि.वि.ड्रॅगोस पेट्री पोपेंगा(रोमानिया)(6)6-1, 6-3;
वितेक होरक(चेक प्रजासत्ताक)वि.वि.वंश कपूर(भारत)6-2, 6-0;
जॅक लौतीत(न्यूझीलंड)वि.वि.क्रिशन हुडा(भारत)6-2, 6-4;
दायसुके इनग्वा(जपान)(8)वि.वि.ध्रुव तंगरी(भारत) 7-5, 0-6, 6-2;
आर्यन भाटिया(भारत)वि.वि.कार्तिक सक्सेना(भारत)6-1, 6-1;
रिकुतो यामागूची(जपान)वि.वि.अनर्घ गांगुली(भारत)7-5, 6-1;
रोस्टीस्लाव गॅलफिंगर(कझाकस्तान)(3)वि.वि.डेनिम यादव(भारत)6-3, 6-2;
मथास मुसील(चेक प्रजाकसत्ताक)(5)वि.वि.दक्ष अगरवाल(भारत)6-0, 6-0;
मुली:
मारिया शोल्कोवा(रशिया)(1)वि.वि.भक्ती परवानी(भारत)6-0, 6-2;
सायका ईशी(जपान)वि.वि.संजना सिरीमल्ला(भारत)6-2, 6-2;
झिजून जियांग(चीन)(7)वि.वि.प्रेरणा विचारे(भारत)7-6(7), 6-3;
वैष्णवी आडकर(भारत)वि.वि.यु-युन ली(तैपेई)(5) 6-2, 4-6, 7-6(5);
सलकथीप ओनमूआंग(थायलंड)(6)वि.वि.ऋतुजा चाफळकर(भारत)6-3, 6-2;
जिऑन झुई(चीन)वि.वि.रेश्मा मारूरी(भारत)7-5, 6-3;
लांलाना तारारुडी(थायलंड)(3)वि.वि.मल्लिका मराठे(भारत) 4-0 सामना सोडून दिला.