पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत इन्फोसीस संघाचा गतवर्षीच्या टीसीएस संघाशी विजेतेपदासाठी लढत होणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत इन्फोसीस संघाने टेक महिंद्रा संघाचा तर टीसीएस संघाने केपीआयटी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शारॉन थॉमसनच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर इन्फोसीस संघाने टेक महिंद्रा संघाचा 36 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना मकरंद ढमालेच्या 46 , साईनाथ शिंदेच्या 40 व गौरव बाबेलच्या 31 धावांसह इन्फोसीस संघाने 19.2 षटकात सर्वबाद 170 धावा केल्या. 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शारॉन थॉमसन व जगन्नाथ गिड्डीमे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टेक महिंद्रा संघाचा डाव 20 षटकात 7 बाद 134 धावांत रोखला. 26 धावांत 3 गडी बाद करणारा शारॉन थॉमसन सामनावीर ठरला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत विप्लव जंघारेच्या दमदार 83 धावांच्या दोरावर टीसीएस संघाने केपीआयटी संघाचा 11 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना टीसीएस संघाने 20 षटकात 4 बाद 164 धावा केल्या. यात विप्लव जंघारेने 40 धावात पाच चौकार व 6 षटकारांसह 83 धावा केल्या. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक जासोरे, गौरव भालेराव व तेजपाल सिंग चिरागीया यांच्या अचीक गोलंदाजीपुढे केपीआयटी संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 153 धावांत रोखला 40 चेंडूत 83 धावा करणारा विप्लव जंघारे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
इन्फोसीस – 19.2 षटकात सर्वबाद 170 धावा(मकरंद ढमाले 46 (36), साईनाथ शिंदे 40 (20), गौरव बाबेल 31 (24), स्वप्निल सवागवे 3/24 , विनित पाठक3/32) वि.वि टेक महिंद्रा – 20 षटकात 7 बाद 134 धावा(अंकित ठाकरे 22 (25), सचिन पिंपरीकर 42 (32), विजय चाफळे नाबाद 21(16), शारॉन थॉमसन 3/26 , जगन्नाथ गिड्डीमे 2/30) सामनावीर- शारॉन थॉमसन
इन्फोसीस संघाने 36 धावांनी सामना जिंकला
टीसीएस- 20 षटकात 4 बाद 164 धावा(विक्रमजीत सिंग 21 (29), विप्लव जंघारे 83 (40), नागराज अलोके 2/22 )वि.वि केपीआयटी – 20 षटकात 8 बाद 153(देबोल दास नाबाद 74(44), अंबर दांडगवल 36 (33), मयंक जासोरे 3/16 ,गौरव भालेराव 2/23 ,तेजपाल सिंग चिरागीया 2/10) सामनावीर- विप्लव जंघारे
टीसीएस संघाने 11 धावांनी सामना जिंकला.