वरिष्ठ स्नूकरमध्ये ब्रिजेश दमानी, आदित्य मेहता, लक्ष्मण रावत यांचे विजय
पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ मुलींच्या बिलियर्ड्स गटात आर. उमादेवी नागराज, अमी कमानी, अरांता सॅचेस, किरथ भंडाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकाच्या आर.उमादेवी नागराज हिने आपलीच राज्य सहकारी वर्षा संजीवचा 2-0(76-45, 76-35) असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यप्रदेशच्या अमी कमानी हिने कर्नाटकाच्या चित्रा एम.वर 2-0(76(67)-16, 78-44) असा विजय मिळवला. अमी हिने आपल्या खेळीत पहिल्या फ्रेममध्ये 67 गुणांचा ब्रेक नोंदविला. महाराष्ट्राच्या अरांता सॅचेस हिने तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रनचे आव्हान 2-1(31-75, 75(58)-23, 75-64) असे संपुष्टात आणले. दिल्लीच्या किरथ भंडाल हिने कर्नाटकाच्या कीर्थना पी.चा 2-0(76-54, 75-68) असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
वरिष्ठ स्नूकर मुलांच्या गटात राउंड रॉबिन फेरीत न गटात माजी आशियाई क्रीडा स्पर्धेतील रजत पदक विजेत्या पीएसपीबीच्या ब्रिजेश दमानी याने माजी सिक्स रेड स्नूकर जागतिक क्र.3 खेळाडू महाराष्ट्राच्या शिवम अरोराचा 4-3(64-51, 62-75, 01-82, 82(68)-21, 32-50, 80(80)-00, 74-23) असा संघर्षपूर्ण पराभव केला. क गटात पीएसपीबीच्या आदित्य मेहता याने तामिळनाडूच्या विजय निचानीवर 4-1(95(60)-00, 67-74, 60-09, 69-05, 55-18) असा विजय मिळवला. ड गटात आयबीएसएफ जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या पीएसपीबीच्या कमल चावला याने पंजाबच्या मनदीप सिंगला 4-0(67-06, 60-44, 51-27, 70(656)-11) असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: वरिष्ठ बिलियर्ड्स मुली: उपांत्यपूर्व फेरी:
आर.उमादेवी नागराज(कर्नाटक)वि.वि.वर्षा संजीव(कर्नाटक)2-0(76-45, 76-35);
अमी कमानी(मध्यप्रदेश)वि.वि.चित्रा एम.(कर्नाटक)2-0(76(67)-16, 78-44);
अरांता सॅचेस(महाराष्ट्र)वि.वि.अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)2-1(31-75, 75(58)-23, 75-64);
किरथ भंडाल(दिल्ली)वि.वि.कीर्थना पी.(कर्नाटक) 2-0(76-54, 75-68);
वरिष्ठ स्नूकर मुले: राउंड रॉबिन फेरी:
गट अ: पंकज अडवानी(पीएसपीबी)वि.वि.आदित्य अगरवाल(आरएसपीबी)4-0(70-29, 100-08, 78(78)-13, 49-31);
गट अ: पारस गुप्ता(मध्यप्रदेश)वि.वि.मनीष जैन(पश्चिम बंगाल)4-2(42-67, 74(63)-37, 83-48, 95(87)-00, 07-55, 72-26);
गट ब: लक्ष्मण रावत(पीएसपीबी)वि.वि.शोएब खान(दिल्ली)4-2(59-38, 77(50)-26, 27-76(61), 45-73, 95(50)-25, 80-20);
गट क: आदित्य मेहता(पीएसपीबी)वि.वि.विजय निचानी(तामिळनाडू)4-1(95(60)-00, 67-74, 60-09, 69-05, 55-18);
गट ड: कमल चावला(आरएसपीबी)वि.वि.मनदीप सिंग(पंजाब)4-0(67-06, 60-44, 51-27, 70(656)-11);
गट इ: सौरव कोठारी(पीएसपीबी)वि.वि.अनुज भार्गवा(उत्तरप्रदेश)4-1(71-39, 57-66, 77(77)-00, 88(88)-04, 112(75)-14);
गट न: मोहम्मद हुस्सेन(आरएसपीबी)वि.वि.गिरीश(आरएसपीबी)4-1(66-42, 59-10, 54-41, 46-53, 65(43)-30);
गट न: ब्रिजेश दमानी(पीएसपीबी)वि.वि.शिवम अरोरा(महाराष्ट्र)4-3(64-51, 62-75, 01-82, 82(68)-21, 32-50, 80(80)-00, 74-23);
गट ओ: राहुल सचदेवा(महाराष्ट्र)वि.वि.अर्शद झामा(पश्चिम बंगाल) 4-1(75(60)-43, 38-69, 74-53, 67-14, 58-23);
गट ओ: आलोक कुमार(पीएसपीबी)वि.वि.अनमोलदीप सिंग(पंजाब)4-2(69-32, 69-21, 43-78, 61-35, 38-72, 48-42);
गट प: धर्मिन्दर लिली(पंजाब)वि.वि. मनन चंद्रा(पीएसपीबी)4-0(64-28, 77-30, 48-33, 56-27);
गट प: रोवीन डिसुझा(आरएसपीबी)वि.वि.आय.एच मनुदेव(हरयाणा)4-3(56(48)-81(54), 60-19, 00-72(72), 74-17, 38-60, 55-19, 75-20);