पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलींच्या गटात अनुपमा रामचंद्रन, सान्वी शहा, अनिता बिजू, मोहिथा आरटी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन हिने गुजरातच्या आन्या पटेलचा 190(45)-60 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अनुपमा हि चेन्नई येथे टीएनबीएसए आणि मायलापोर क्लब येथे प्रशिक्षक एसए सलीम यांच्या मार्गदर्शनखाली सराव करते. केरळच्या अनिता बिजू हिने तामिळनाडूच्या साफिलो सारा बेनीचा 164-99 असा तर, मध्यप्रदेशच्या सान्वी शहा हिने तामिळनाडूच्या स्नेथरा बाबूचा 103-63 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
वरिष्ठ स्नूकर गटात डबल एलिमनेशन फेरीत इ गटात महाराष्ट्राच्या रोहन साकलकर याने गुजरातच्या जेनीन पटेलचा 3-0(65-57, 50-41, 78-29) असा पराभव करून दुसरा विजय नोंदविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सब-ज्युनियर मुली बिलियर्ड्स: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि. आन्या पटेल(गुजरात)190(45)-60;
अनिता बिजू(केरळ)वि.वि.साफिलो सारा बेनी(तामिळनाडू)164-99;
मोहिथा आरटी(तामिळनाडू)वि.वि.श्रेया दुबे(मध्यप्रदेश)96-52;
सान्वी शहा(मध्यप्रदेश)वि.वि.स्नेथरा बाबू(तामिळनाडू)103-63;
टिमशी गुप्ता(मध्यप्रदेश)वि.वि.हजरा फारुखी(मध्यप्रदेश)99-61;
कीर्थना पी.(कर्नाटक)वि.वि.मनस्विनी एस.(तामिळनाडू)133-81;
वरिष्ठ स्नूकर: डबल एलिमनेशन फेरी:
गट क: मनीष जैन(पश्चिम बंगाल)वि.वि.के. लालकिमा(मिझोराम)3-0(61-17, 66-33, 75-46);
गट क: वेंकटेशाम(आरएसपीबी)वि.वि.सुमित एस.(आसाम)3-0(62-55, 56-27, 62-42);
गट क: अनुज उप्पल(दिल्ली)वि.वि.पारतिभा राजेंद्र(तामिळनाडू)3-1(65-41, 26-61, 83(62)-09, 66-65);
गट इ: रोहन साकलकर(महाराष्ट्र)वि.वि.जेनीन पटेल(गुजरात)3-0(65-57, 50-41, 78-29);
गट ग: लालरीना रेंटली(मिझोराम)वि.वि.निशाद चौघुले(महाराष्ट्र)3-2(56-59, 61-19, 40-58, 83-43, 61-49);
गट ग: एस.दिलीप कुमार(आरएसपीबी)वि.वि.अनुज भार्गवा(उत्तरप्रदेश)3-0(65-59, 63(63)-00, 62(29)-22);