पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या तर्फे व केपीआयटी-आयकॉन यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए आयकॉन कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2020 स्पर्धेत पहिल्या फेरीत सिद्धार्थ कोंढाळकर, श्रेयश गवारी, अवनीश नाईकवाडी, सर्वज्ञ सरोदे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ कोंढाळकर याने अर्णव पांडेचा टायब्रेकमध्ये 5-4(6) असा संघर्षपूर्ण पराभव केला. श्रेयश गवारीने रिशान शहावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. अवनीश नाईकवाडी याने विहान सावंतला 5-3 असे पराभूत केले. आरिन ठावकर व राघव सरोदे यांनी अनुक्रमे देवांक उंडरे व ईशान शिंगटे यांचा 5-1 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 10 वर्षाखालील मुले:
जतीन बोरटक्के वि.वि.सुश्रुत बोरगांवकर 5-1;
आरिन ठावकर वि.वि. देवांक उंडरे 5-1;
राघव सरोदे वि.वि.ईशान शिंगटे 5-1;
सर्वज्ञ सरोदे वि.वि.तनिष्क देवरे 5-2;
सिद्धार्थ कोंढाळकर वि.वि.अर्णव पांडे 5-4(6);
विहान कुलकर्णी वि.वि.श्लोक शर्मा 5-3;
श्रेयश गवारी वि.वि.रिशान शहा 5-0;
अवनीश नाईकवाडी वि.वि.विहान सावंत 5-3.