पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 2लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात हृदया शहा, गार्गी पवार, कशिश बोटे, मोहिनी घुले या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या हृदया शहा हिने आपली राज्य सहकारी आर्याली चव्हाणचा 9-5 असा तर, गार्गी पवार हिने समीरा सलीहूदंचा 9-0 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या कशिश बोटेने गुजरातच्या धरा ठाकोरला 9-2 असे नमविले.
पुरुष गटात पहिल्या पात्रता फेरीत आदित्य भावे याने ब्रम्हा मोहितेचा टायब्रेकमध्ये 9-8(5) असा पराभव करून आगेकूच केली. प्रसाद इंगळे याने पराग ढोकेवर 9-6 असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: महिला:
पवित्रा रेड्डी वि.वि.श्रेया सागडे 9-1;
शनाया नाईक वि.वि.अमुल्या पेनिकलापती 9-0;
श्रुष्टी राय वि.वि.भाविका गुंडेचा 9-3;
हृदया शहा वि.वि.आर्याली चव्हाण 9-5;
लालित्या कल्लुरी रेड्डी वि.वि.अपर्णा कोंडावत्ती 9-3;
गार्गी पवार वि.वि.समीरा सलीहूदं 9-0;
कशिश बोटे वि.वि.धरा ठाकोर 9-2;
मोहिनी घुले वि.वि.ओमेश्वरी चव्हाण 9-4;
पुरुष:
आदित्य भावे वि.वि.ब्रम्हा मोहिते 9-8(5);
प्रसाद इंगळे वि.वि.पराग ढोके 9-6;
पवन पाटील वि.वि.प्रत्यूश सोनावणे 9-1;
शशांक तिवारी वि.वि.सिद्धार्थ कुमार 9-2;
पार्थ चिवटे वि.वि.धनेश गायकवाड 9-1;
वर्धन कारकल वि.वि.पुनीत ढोके 9-4.