पुणे–पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, पीसीएलटीए आणि ओडीएमटी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गिरीश कुलकर्णी, कल्पेश मंकणी, रवी जौकनी, कुरियन थडकन, अनंत गुप्ता, धीरेंद्र वर्मा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीसीएलटीए संघाने माऊंट व्हर्ट प्रीस्टाईन संघाचा 18-8 असा पराभव करून विजयी सलामी दिली. पीवायसी अ संघाने ओडीएमटी ब संघाचा 18-6 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून अमित लाटे, सारंग पाबळकर, मिहीर दिवेकर, सारंग देवी, योगेश पंतसचिव, अमित नाटेकर यांनी सुरेख कामगिरी बजावली. ओडीएमटी अ संघाने पीवायसी फ संघाचा 18-3 असा एकतर्फी पराभव केला.
स्पर्धेत एकूण 28संघांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये पीवायसी अ, सोलारिस आरपीटीए, ओडीएमटी ब, बालेवाडी टेनिसनट्स, एमडब्लूटीए, पीवायसी ब, टेनिस एसेस, सोलारिस फायटर्स, गोल्डन बॉईज, पीवायसी फ, ओडीएमटी अ, सोलारिस डायनामोज, एफसी अ, पीवायसी ज, आरपीटीए गोगेटर्स, महाराष्ट्र मंडळ, एमडब्लूटीए एसपी कॉलेज, पीवायसी ड, डेक्कन 2, बालेवाडी टेनिस ग्रुप, पीसीएलटीए, पीवायसी क, मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन, लॉ चार्जर्स , लॉ कॉलेज लायन्स, पीवायसी इ, डेक्कन 1 आणि एफसी ब यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, आशा साने आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीसीएलटीए वि.वि. मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 18-8(80अधिक गट: गिरीश कुलकर्णी/कल्पेश मंकणी वि.वि.गिरीश के/मनिष टी 6-2; खुला गट: रवी जौकनी/कुरियन थडकन वि.वि.सुधाकर/धर्मेश 6-2;खुला गट: अनंत गुप्ता/धीरेंद्र वर्मा वि.वि.श्रीकांत/सचिन 6-4);
पीवायसी अ वि.वि.ओडीएमटी ब 18-6(80अधिक गट: अमित लाटे/सारंग पाबळकर वि.वि.उमेश दळवी/सुनील सोनवंती 6-4; खुला गट:मिहीर दिवेकर/सारंग देवी वि.वि.राम नायर/राहुल पटेल 6-2; खुला गट: योगेश पंतसचिव/अमित नाटेकर वि.वि.प्रशांत घाटगे/आदित्य शुक्ला 6-0
ओडीएमटी अ वि.वि.पीवायसी फ 18-3(80अधिक गट: इंद्रनील चक्रवर्ती/हिमांशू कपाडिया वि.वि.हरिष गलानी/संजीव गुजर 6-0; खुला गट: नितीन संघवी/रोहन साने वि.वि.रवी रावळ/राहुल रोडे 6-1; खुला गट: कौस्तुभ देशमुख/कोनार कुमार वि.वि.नेहा ताम्हाणे/पराग टेपण 6-2);