पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये उपांत्य फेरीत मुंबईच्या व अनेक वेळा बिलियर्डस स्पर्धेतील विजेता अरुण अग्रवाल, रयान राझमी यांनी अनुक्रमे राजीव शर्मा व चंदू कन्सोदरिया यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात मुंबईच्या अरुण अग्रवाल याने शहर सहकारी राजीव शर्माचा 3-1(150-101, 72-150(118), 150-103, 150-72) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. राजीव यांनी आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 118 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत 21वर्षाखालील गटातील राज्यातील अव्वल स्नूकर खेळाडू रयान राझमीने आपली विजयी मालिका कायम ठेवत चंदू कन्सोदरियाचा 3-2(150-51, 150(73)-68, 50-152, 148-153, 150(67)-40) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्नूकरमध्ये पहिल्या पात्रता फेरीत पुण्याच्या निशाद चौघुले याने सत्चित जामगांवकरचा 3-0(64-02, 57-02, 65-33) असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला. पण अंतिम पात्रता फेरीत संकेत मुथा उपस्थित न राहिल्यामुळे निशादला पुढे चाल देण्यात आली. अंतिम पात्रता फेरीत पुण्याच्या सालदूरकरने मुंबईच्या शुभोजीत रॉयचा 3-0(71-59, 47-30, 66-40) असा पराभव करून राउंड रॉबिन फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: बिलियर्ड्स: उपांत्यपूर्व फेरी:
रयान राझमी(मुंबई)वि.वि.शिवम अरोरा(पुणे)3-1(100-150,150-95,151-20,150-137)
अरुण अग्रवाल(मुंबई)वि.वि.मनन शहा(मुंबई)3-0(150-99,150-76,150,111);
चंदू कन्सोदरिया(मुंबई)वि.वि.अमित सप्रू(मुंबई)3-2(150-51,141-151,72-150,151-67,151,118)
राजीव शर्मा(मुंबई)वि.वि.यश रुंगता(मुंबई)3-1(152-50,151-101,145-151,150,83)
उपांत्य फेरी:
अरुण अग्रवाल(मुंबई)वि.वि.राजीव शर्मा(मुंबई) 3-1(150-101, 72-150(118), 150-103, 150-72);
रयान राझमी(मुंबई)वि.वि.चंदू कन्सोदरिया(मुंबई) 3-2(150-51, 150(73)-68, 50-152, 148-153, 150(67)-40);
स्नूकर: पहिली पात्रता फेरी:
ओमर फारुकी(औरंगाबाद)वि.वि.नेविल राझमी(मुंबई)3-0(69-35,66-11,60-32);
रिषभ गोहिल(मुंबई)वि.वि.जाफर इकबाल(औरंगाबाद)3-0(53-35,67-38,57-32)
अनंत मेहता(मुंबई)वि.वि.सतीश कराड(पुणे)3-2(17-56,53-11,42-66,64-37,65-18);
आनंद रघुवंशी(मुंबई)वि.वि.प्रशांत नातू(पुणे)3-0(76-02,65-28,67-07);
राजवर्धन जोशी(पुणे)वि.वि.संदीप वेंगुर्लेकर(मुंबई)3-0(71-22,57-30,75-17);
निशाद चौघुले(पुणे)वि.वि.सत्चित जामगांवकर(पुणे) 3-0(64-02, 57-02, 65-33);
सुमित आहुजा(मुंबई)वि.वि.निलेश पाटणकर(पुणे)3-2(67-33,22-63,52-13,44-47,84-26).