पुणे, दि. 22 नोव्हेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्या दिवशी यतीन एम(10-48-3), प्रसन्ना हजारे(14-47-3) यांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीला 150 धावांवर रोखून आपले वर्चस्व राखले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या अंतिम सामन्याच्या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केडन्सच्या यतीन एम(48-3), प्रसन्ना हजारे(47-3), शुभम खरात (23-2), गौरव कुमकर(21-2)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक संघाचा डाव 44.3षटकात 158धावांवर संपुष्टात आला. यात अद्वैत मुळ्येने एकाबाजूने लढताना 75 चेंडूत 5चौकार व 4षटकारांच्या मदतीने 49 धावांची संयमपूर्ण खेळी केली. अद्वैत मुळ्ये यतीनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कपिल देडगेकडे झेल बाद झाल्यानंतर श्रेयश केळकर 30, यश जगदाळे 23, यज्ञेश मोरे 16, हर्षवर्धन पवार नाबाद 12 यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला.
याच्या उत्तरात केडन्स संघाने पहिल्या डावात आजदिवस अखेर 46षटकात 4बाद 109धावा केल्या. यात तेजस बांदल(14धावा)व प्रद्युम्न चव्हाणने 52चेंडूत 25धावा या सलामीच्या जोडीने 87चेंडूत 41 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर गौरव कुमकरने 64 चेंडूत 3चौकारांच्या मदतीने 27धावा व ऋषी राऊत(नाबाद 25धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 101 चेंडूत 32धावांची भागीदारी केली. अजून शुभम खरात नाबाद 4धावा व ऋषी राऊत नाबाद 25धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व केडन्स यांच्यातील लढतीचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.3षटकात सर्वबाद 158धावा(अद्वैत मुळ्ये 49(75,5×4,4×6), श्रेयश केळकर 30(31,6×4), यश जगदाळे 23, यज्ञेश मोरे 16, हर्षवर्धन पवार नाबाद 12, यतीन एम 10-48-3, प्रसन्ना हजारे 14-47-3, शुभम खरात 3.3-23-2, गौरव कुमकर 5-21-2)वि.केडन्स: 46षटकात 4बाद 109धावा(तेजस बांदल 14, गौरव कुमकर 27(64,3×4), प्रद्युम्न चव्हाण 25(52,5×4), ऋषी राऊत नाबाद 25(67,4×4), शुभम खरात नाबाद 4, रोहित चौधरी 17-50-2, सोहम जामले 16-15-2)