पुणे, दि. 19 नोव्हेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात ओंकार यादव(166धावा) व प्रथमेश बजारी(126धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघापुढे 406धावांचे आव्हान उभे केले आहे. तर, दुसऱ्या सामन्यात यश मंगवानी नाबाद 61, आर्यन ए. 40 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर कॅडेन्स संघाने 249धावा केल्या.
डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी संयुक्त जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना 90षटकात 6बाद 406धावा केल्या. यात ओंकार यादवने 258चेंडूत 20चौकार व 2षटकारांच्या मदतीने 166धावा, तर प्रथमेश बजारीने 154 चेंडूत 17चौकारांच्या मदतीने 126 धावा केल्या. ओंकार यादव व प्रथमेश बजारी यांनी दुसऱ्या गडयासाठी 280चेंडूत 187धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर ओंकार यादवने क्षितिज पाटील(नाबाद 60धावा)च्या साथीत चौथ्या गडयासाठी 131चेंडूत 11धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली. व्हेरॉक संघाकडून रोहित चौधरी(133-2), यश जगदाळे(48-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. संयुक्त जिल्हा संघ व व्हेरॉक यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
दुसऱ्या सामन्यात कॅडेन्स संघाने पहिल्यांदा खेळताना 90षटकात 9बाद 249धावा केल्या. यात यश मंगवानी नाबाद 61, आर्यन ए. 40, प्रद्युम्न चव्हाण 36, अभिजित सावळे 34, तेजस बांदल 30 यांनी धावा केल्या. पीवायसीच्या यश खळदकरने सुरेख गोलंदाजी करत 26धावात 4गडी बाद केले. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आजदिवसअखेर 2षटकात बिनबाद 12धावा केल्या. यात आदर्श बोथरा नाबाद 8, साहिल मदन नाबाद 4धावांवर खेळत आहे. दोन्ही संघाचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: संयुक्त जिल्हा संघ: 90षटकात 6बाद 406धावा(ओंकार यादव 166(258,20×4,2×6), प्रथमेश बजारी 126(154,17×4), क्षितिज पाटील नाबाद 60(75,8×4), सौरभ गढक 20, रोहित चौधरी 24-133-2, यश जगदाळे 9-48-2, हर्षवर्धन पवार 13-51-1)वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी;
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: कॅडेन्स: 90षटकात 9बाद 249धावा(यश मंगवानी नाबाद 61(88,5×4,2×6), आर्यन ए. 40(79,4×4), प्रद्युम्न चव्हाण 36, अभिजित सावळे 34, तेजस बांदल 30, यश खळदकर 4-26, आर्या जाधव 1-63, आदर्श बोथरा 2-34)वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 2षटकात बिनबाद 12धावा(आदर्श बोथरा नाबाद 8, साहिल मदन नाबाद 4); कॅडेन्स संघाकडे पहिल्या डावात 237धावांची आघाडी.