पुणे, 18 नोव्हेंबर 2019 : सोलारिस क्लब व पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डायमंड्स, डेक्कन चार्जर्स, डेक्कन वॉरियर्स आणि पीसीएलटीए या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मयूर कॉलनी येथील सोलारिस क्लब टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डायमंड्स संघाने टेनिस टायगर्स संघाचा 21-15 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून हनिफ मेमन, अनुप मिंडा, ध्रुव मेड, अभिषेक ताम्हाणे, अनुप मिंडा, केदार देशपांडे यांनी सुरेख कामगिरी केली.
डेक्कन वॉरियर्स संघाने डेक्कन अवेंजर्सचा 19-09 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. डेक्कन वॉरियर्सकडून नितीन भावे, अजय जाधव, संजय कामत, अमोद वाकणकर, अमित सुमंत, सिद्धार्थ देसाई यांनी अफलातून कामगिरी बजावली.
अन्य लढतीत डेक्कन चार्जर्स संघाने महाराष्ट्र मंडळचा 20-09असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पीसीएलटीए संघाने एमडब्लूटीए अ संघाचा 20-18 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
डायमंड्स वि.वि.टेनिस टायगर्स 21-15(100अधिक गट: हनिफ मेमन/अनुप मिंडा वि.वि.संतोष जयभाय/जितेंद्र जोशी 6-2; 90अधिक गट: अमित नाटेकर/अमित लाखे पराभूत वि.तारख पारीख/केतन जाठर 3-6; खुला गट: ध्रुव मेड/अभिषेक ताम्हाणे वि.वि.केदार पाठक/बाबू जाधव 6-5(11-9); अनुप मिंडा/केदार देशपांडे वि.वि.जितेंद्र जोशी/शिवाजी यादव 6-2);
डेक्कन चार्जर्स वि.वि.महाराष्ट्र मंडळ 20-09(100अधिक गट: आशिष पुंगलिया/नितीन जोशी वि.वि.रवी कोठारी/अनिल कोठारी 6-2; 90अधिक गट: अजय कामत/मदन गोखले वि.वि.संजय सेठी/अर्पित श्रॉफ 6-0; खुला गट: नितीन जोशी/मिहीर केळकर पराभूत वि.अभिषेक चव्हाण/रवी कोठारी 2-6; खुला गट: मुकुंद जोशी/ऋषिकेश पाटसकर वि.वि.कमलेश शहा/आर देशमुख 6-1);
डेक्कन वॉरियर्स वि.वि.डेक्कन अवेंजर्स 19-09(100अधिक गट: नितीन भावे/अजय जाधव वि.वि.पद्माकर कर्वे/विजय गोखले 6-0; 90अधिक गट: संजय कामत/अमोद वाकणकर वि.वि.आलोक गोळे/अमूल बापट 6-0; खुला गट: अमित पाटणकर/नितीन भावे पराभूत वि.विजय गोखले/सचिन आराध्ये 1-6; खुला गट: अमित सुमंत/सिद्धार्थ देसाई वि.वि.केदार जोगळेकर/राजीव पागे 6-3);
पीसीएलटीए वि.वि.एमडब्लूटीए अ 20-18(100अधिक गट: राजेश मित्तल/निर्मल वाधवानी पराभूत वि.सुनील लुल्ला/मनोज हार्डीकर 4-6; 90अधिक गट: रवी जौकनी/गिरीश कुलकर्णी पराभूत वि.गजानन कुलकर्णी/मंदार वाकणकर 4-6; खुला गट: नंदू रोकडे/विशाल साळवी वि.वि.राजेश मंकणी/सुनील लुल्ला 6-1; खुला गट: जॉय बॅनर्जी/अनंत गुप्ता वि.वि.विवेक खडगे/सुमंत पॉल 6-5(7-5)).