मुंबईच्या अजिंक्य येलवेचा 62 गुणांचा ब्रेक
पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत साद सय्यद, अजिंक्य येलवे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत मुंबईच्या अजिंक्य येलवे याने चिपळूणच्या सिद्धेश मुळ्येचा 4-2(27-40, 38-05, 41-37, 01-40, 43-41, 62(62)-01) असा पराभव करून बाद फेरी गाठली. अजिंक्य याने आपल्या खेळीत सहाव्या फ्रेममध्ये 62 गुणांचा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट ब्रेक नोंदविला.
पुण्याच्या साद सय्यद याने मुंबईच्या अजिंक्य येलवेचा 4-1(38-10, 43-33, 41-30, 08-35, 36-30) असा पराभव करून बाद फेरीत धडक मारली. पुण्याच्या सलील देशपांडेने कुणाल वासवानीचा 4-1(34-03, 35-22, 40-05, 20-30, 42-14) असा पराभव करून आगेकूच केली. अभिषेक बोराने योगेश शर्माचा 4-3(38-25, 63-02, 38-35, 23-33, 14-28, 28-34, 33-19) असा संघर्षपूर्ण पराभव केला. स्पर्धेच्या बाद फेरीस आज(11 नोव्हेंबर रोजी)दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: डबल एलिमनेशन फेरी:
साद सय्यद(पुणे)वि.वि.अजिंक्य येलवे(मुंबई)4-1(38-10, 43-33, 41-30, 08-35, 36-30);
रोहन कोठारी(औरंगाबाद)वि.वि.सत्चित जामगावकर(पुणे) 4-1(08-36, 43-05, 42-33, 53-05, 36-33);
योगेश शर्मा(पुणे)वि.वि.अमेय संखला(मुंबई) 4-1(42-33, 28-24, 34-19, 19-27, 36-15);
सिद्धेश मुळ्ये(चिपळूण)वि.वि.अनंत मेहता(मुंबई) 4-0(36-33, 47-13, 42-33, 33-27);
आदित्य शांडिल्या(मुंबई)वि.वि.अलेक्झांडर रेगो(पुणे) 4-3(27-18, 39-22, 01-46(46), 12-34, 44-05, 25-41, 36-25);
सलील देशपांडे(पुणे)वि.वि.कुणाल वासवानी(पुणे) 4-1(34-03, 35-22, 40-05, 20-30, 42-14);
रोहन कोठारी(औरंगाबाद)वि.वि.सुमित सालदुलकर(मुंबई) 4-3(01-52, 43-13, 23-35, 16-33, 43-19, 42-13, 44-00);
अभिषेक बोरा(पुणे)वि.वि.योगेश शर्मा(पुणे) 4-3(38-25, 63-02, 38-35, 23-33, 14-28, 28-34, 33-19);
आदित्य शांडिल्या(मुंबई)वि.वि.सत्चित जामगावकर(पुणे) 4-1(17-45, 35-14, 50-17, 40-08, 29-16);
सलील देशपांडे(पुणे)वि.वि.अमेय संखला(मुंबई) 4-3(33-26, 01-35, 20-43, 59-33, 09-31, 37-34, 36-07);
अजिंक्य येलवे(मुंबई)वि.वि.सिद्धेश मुळ्ये(चिपळूण) 4-2(27-40, 38-05, 41-37, 01-40, 43-41, 62(62)-01).