औरंगाबाद: एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात तेलंगणाच्या विनिथ मुत्यालाने महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेचा तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या परी चव्हाणने तमिळनाडूच्या कुंदना भंडारूचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात तेलंगणाच्या विनिथ मुत्यालाने महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेचा 6-3,4-6,6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने तमिळनाडूच्या चौथ्या मानांकीत कुंदना भंडारूचा 6-2,1-6,6-3 असा पराभव केला. मुंबईची परी प्राक्टटेनिस अकादमी येथे प्रशिक्षक अॅलन मोसेस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक आशी पारितोषिके देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण वेस्ट झोन क्रीडा प्राधिकरणाचे उप संचालक विरेंद्र भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एड्युरन्स्चे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्ता, मनोज वैद्य, स्पर्धेच्या रेफ्री वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होतो.