औरंगाबाद: एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वैभव श्रीराम, अधिरी अवल व सिद्धार्थ मराठे यांनी तर मुलींच्या गटात साहिरा सिंग, परी चव्हाण, सायना देशपांडे व अमोदीनी नाईक यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत वैभव श्रीरामने हरियाणाच्या अव्वल मानांकीत वंश नांदलचा 3-6, 6-1, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने चौथ्या मानांकीत महाराष्ट्रच्या वितीन राठीचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेने कर्नाटक नवव्या मानांकीत स्कंद रावचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.
मुलींच्या गटात उप-उपांत्यपुर्व फेरीत महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत मधुरीमा सावंतने तेलंगणाच्या अव्वल मानांकीत चांदनी श्रीनिवासनचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पंजाबच्या बिगर मानांकीत साहिरा सिंगने दिल्लीच्या तिस-या मानांकीत रिया सचदेवचा 6-2,6-4 असा पराभव करत खळबलजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने तेलंगणाच्या सातव्या मानांकीत सौम्या रोंडेचा 6-4, 6-0 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सायना देशपांडेने उत्तर प्रदेशच्या दहाव्या मानांकीत सौम्रीती वर्माचा 6-3, 6-3 असा तर कर्नाटकच्या अमोदीनी नाईकने दिल्लीच्या पाचव्या मानांकीत समिक्षा दबसचा 6-2,7-6(7) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उप-उपांत्यपुर्व फेरी:
वैभव श्रीराम (महाराष्ट्र)वि.वि. वंश नांदल(1)(हरियाणा) 3-6, 6-1, 7-5
अधिरी अवल(दिल्ली) वि.वि वितीन राठी(4)(महाराष्ट्र)6-2, 6-2
सिद्धार्थ मराठे(महाराष्ट्र)वि.वि. स्कंद राव(9)(कर्नाटक) 6-2, 6-2
विनिथ मुत्याला(महाराष्ट्र) वि.वि अर्णव कोकणे(महाराष्ट्र) 7-6(6),7-6(6),6-1
काहिर वारीक(महाराष्ट्र)(6)वि.वि. भारत फुलवारीया(दिल्ली) 6-4, 6-4
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र) वि.वि. सार्थ बनसोडे(महाराष्ट्र) 6-3, 6-1
ऋषील खोसला(2)(कर्नाटक)वि.वि. रुरीक रजनी (तमिळनाडू)6-2, 6-2
मुली: उप-उपांत्यपुर्व फेरी:
मधुरीमा सावंत(महाराष्ट्र)वि.वि चांदनी श्रीनिवासन(1)(तेलंगणा) 6-1, 6-0
साहिरा सिंग(पंजाब) वि.वि रिया सचदेव(3)(दिल्ली) 6-2,6-4
परी चव्हाण(9)(महाराष्ट्र) वि.वि सौम्या रोंडे(7)(तेलंगणा)6-4, 6-0
सायना देशपांडे(महाराष्ट्र) वि.वि सौम्रीती वर्मा(10)(उत्तर प्रदेश)6-3, 6-3
अमोदीनी नाईक(12)(कर्नाटक) वि.वि समिक्षा दबस(5)(दिल्ली)6-2,7-6(7)
कुंदना भंडारू(4)(तमिळनाडू) वि.वि ध्वनी कवद(गुजरात)6-3, 6-3
रुमा गायकैवारी(6)(महाराष्ट्र) वि.वि पुष्टी लध्दा(तेलंगणा) 6-4, 6-2