पुणे- नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकीत अरिंदम बीट याने तिस-या मानांकीत ईशान गोदभरले तर मुलींच्या गटात काम्या परबने तिस-या मानांकीत ऐश्वर्या कुमारचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत अरिंदम बीटने तिस-या मानांकीत ईशान गोदभरलेचा 9-6 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकीत आर्यन कोटस्थाने याने विक्रम अरभट्टीचा 9-5 असा तर आर्यन हुडने जय पवारचा 9-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात बिगर मानांकीत काम्या परबने तिस-या मानांकीत ऐश्वर्या कुमारचा 9-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकीत संजीवनी कुतवळने सातव्या मानांकीत पुर्वा भुजबळचा 9-1 असा तर आशी छाजेडने लोलाक्षी कांकरीयाचा 9-5 असा व गार्गी फुलेने गार्गी शहाचा 9-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्यपुर्व फेरी:
आर्यन हुड वि.वि जय पवार 9-4;
अरिंदम बीट वि.वि ईशान गोदभरले (3) 9-6;
आर्यन कोटस्थाने(5) वि.वि विक्रम अरभट्टी 9-5
मुली
संजीवनी कुतवळ(1) वि.वि पुर्वा भुजबळ (7) 9-1;
आशी छाजेड वि.वि लोलाक्षी कांकरीया 9-5;
काम्या परब वि.वि ऐश्वर्या कुमार (3) 9-3
गार्गी फुले वि.वि गार्गी शहा 9-3.