नाव : श्री. सुभाष राजाराम देसाई
जन्म : 12 जुलै, 1942
जन्म ठिकाण : मालगुंड, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी
शिक्षण : एस. एस. सी., पत्रकारिता पदविका
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुषमा
अपत्ये : एकूण 3 (तीन मुलगे)
व्यवसाय : उद्योग
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारा
निर्वाचित
इतर माहिती : 1982 संस्थापक, ‘प्रबोधन गोरेगाव’ विश्वस्त संस्था; 1973 आंतरशालेय क्रीडा महोत्सव व आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन; 1973 शिवसेना रुग्णवाहिका सेवा गोरेगाव येथे सुरु केली; 1977 प्रमुख कार्यवाह, मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन; 1989 विश्वस्त, प्रबोधन प्रकाशन; प्रकाशक, ‘दैनिक सामना’, साप्ताहिक ‘मार्मिक व ‘दोपहार का सामना’; 1991 प्रबोधन क्रीडा भवनाची उभारणी; 1992 मुख्य संयोजक, कोकण रेल्वे परिषद, खेड, जिल्हा रत्नागिरी; 1999 प्रबोधन जॉगर्स पार्कची उभारणी; 2000 मुख्य संयोजक, मुंबई फेस्टीवल व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उत्सव; 2001 मुख्य संयोजक, ‘हर्बलवल्ड’ औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन; 2002 मध्ये उल्लेखनीय सार्वजनिक कार्याबद्दल संभाजी प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर पुरस्कार प्राप्त; 2003 सहारा विमानतळावर अश्वारूढ शिव प्रतिमेची स्थापना; 2004 प्रबोधन रक्तपेढी सुरु केली; 1966 शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक म्हणून कार्य; 1984 शिवसेना नेता; 1985 प्रमुख संयोजक, शिवसेनेचे दुसरे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन (महाड); 1986-90 शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख; 1989 पासून सरचिटणीस, शिवसेना; 1995 अध्यक्ष, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ; 1990 मध्ये विधानसभेवर निवड; 1994 हिंदुत्वाच्या आधारे प्रचार केला या आक्षेपावरुन न्यायालयाने सदर विधानसभेवरील निवड अवैध ठरविली; 2004-09, 2009-14 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 2015-16 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; 5 डिसेंबर, 2014 पासून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री; जुलै 2016 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर फेरनिवड.
(संदर्भ : महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)