औरंगाबाद – कोरोनाग्रस्तांचा आकडा आता सव्वाशेवर गेला असल्यामुळे कोरोनावर इलाज करण्यासाठी स्पेशल कोरोना हॉस्पिटल्स लागणार आहेत.औरंगाबाद इथं एक रुग्ण आढळला होता, तेव्हापासून इथेही मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये (मिनी घाटी) आता सोमवारपासून स्पेशल कोरोना हॉस्पिटल केले जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मिनी घाटीची पाहणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना तशा उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश गुरुवारी दिले.
सोमवारपासून मिनी घाटीत कोरोना संशयित व बाधितांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.