पुणे-कसब्याने 25 वर्षे आमदारकी,मंत्रिपदे दिली त्यानंतर खासदारकी ..मिळाली … आता तरी कसबा शिवसेनेला द्या ..असे साकडे गणरायाला घालीत थेट प्रचाराचा शुभारंभ म्हणत शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडला ..आता ते खरेच कसब्यात शिवसेनेचा प्रचार करत फिरणार काय ?याचे उत्तर मिळेलच तसेच सेनाप्रमुख देतील तो आदेश आपण पाळू असे सांगत ;कसबा सेनेला द्यावा म्हणून त्यांनी केलेला हा लक्षवेधी प्रयत्न आता नेत्यांच्या किती पचनी पडेल हे देखील दिसून येणार आहेच .
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून गिरीश बापट हे निवडून आले आहे. हा मतदारसंघ राज्यात भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि प्रचंड मतांनी निवडून देखील आले. त्यानंतर गिरीश बापट यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. आता गिरीश बापट यांच्यानंतर कसबा मतदार संघातून उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे. दरम्यान भाजपकडून अनेक नेत्यांची नावं देखील पुढे येत असताना शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी गणरायाची आरती करण्यात आली आणि गणपती बाप्पा मोरया, कसबा शिवसेनेला मिळू दे अशी प्रार्थना देखील करण्यात आल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. तर या सर्व घडामोडी लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खरच युती होणार का? असा प्रश्न देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदारांना पडला असल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे शहरातील आठही मतदारसंघात भाजपाचे आमदार असून ते निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात आज पुण्यात शिवसेनेच्या नगरसेवकाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्याने आगामी काळात जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीमध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीवर असून केंद्रात, राज्यात, महापालिकांमध्ये हे पक्ष सत्तेवर आहेत. या दोन्ही पक्षात अद्यापर्यंततरी सर्वकाही ठीक सुरू असल्याचे दिसत असताना, आता पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी शहराचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया, कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळू दे, अशी प्रार्थना त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणराया चरणी केली.विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणत्याही मतदारसंघातील उमेदवाराची निश्चिती केलेली नसताना किंवा युतीचे जागा वाटपही झालेले नसताना पुण्यात शिवसेनेकडून भाजपाच मतदारसंघ असलेल्या कसबा येथे प्रचाराचा नारळ फोडला गेल्याने युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरादार चर्चा सुरू आहे.आणि अगोदर सांगून जाहीर करून धनवडे यांनी प्रचार शिभारंभ हा तथाकथित प्रकार केला आहे आणि ज्यास त्यांना कोणी रोखण्याचा यत्न मात्र केलेला नाही .