अकोले-
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव होऊ नये तसेच त्याचा प्रसार होऊ नये यासाठी जनसंपर्क असणारे पोलीस व परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांना मास्क व सॅनेटायझर चे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मातोश्री राधा डी फार्मसी कॉलेज विरगावच्या वतीने करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी केलेले आवाहन नुसार अकोले येथे मास्क व सेनेटायझर चे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्यात व परिवहन आगार मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या हस्ते सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनेटायझर चे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जिल्हा अध्यक्ष अनिल राहणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुकाध्यक्ष अशोक उगले, सचिव विध्याचंद्र सातपुते, इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिन खरात, सुनील शेणकर, अल्ताफ शेख, अरुण कराड प्राचार्या पल्लवी फलके, रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कुमकर, भाजपचे नामदेव निसाळ, आदी उपस्थित होते.
अकोले बस आगारात आगर व्यवस्थापक आव्हाड, सचिन वाकचौरे आदींच्या शुभहस्ते मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी मातोश्री राधा डी फार्मसी कॉलेज च्या प्राचार्या पल्लवी फलके यांनी सेनेटायझर चे वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवले
कोरोना सारखा भयानक विषाणू संपर्कातून पसरतो. पोलीस हा जनतेचा सेवक असल्याने नेहमी जनसंपर्क येतो त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने मास्क व सेनेटायझर चे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी महत्वची आहे.
श्री अरविंद जोंधळे
पोलीस निरीक्षक, अकोले पोलीस स्टेशन