पुणे- कोरेगाव पार्क चे नाव बदलणार अशी अफवा काही संधिसाधू राजकारण्यांनी उठविली असून हि शुद्ध राजकीय भोंदुगिरी आहे असा आरोप येथील नगरसेवक उमेश गायकवाड यांनी केला आहे. ते म्हणाले ,’कोरेगाव पार्कचे नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव कधीही आला नाई आणि येणार हि नाही , कोरेगाव पार्कमधील अनेक परिसरांना वेगवेगळी नावे आहेत . त्याप्रमाणे पिंगळे नगर असे नाव एका भागाला देण्यात येणार आहे पण ते पिंगळे नगर , कोरेगाव पार्क ,पुणे 1 अशाच पद्धतीने असणार आहे. महापालिकेच्या नाव समितीच्या बैठकीत यासंदर्भातला ठराव सर्व संमतीने स्पष्ट स्वरूपात झालेला आहे.विद्युत नगर, मीरा नगर ,कवडे वाडी ,दरवडे मळा असे विविध भाग कोरेगाव पार्क परिसरात येतात अशाच पद्धतीने पिंगळे नगर असणार आहे जे कोरेगाव पार्कचाच एक भाग असणार आहे हे स्पष्ट असताना जाणून बुजून काही तरी अफवा उठवून राजकीय भोंदू गिरी करणाऱ्या मंडळींच्या वक्तव्यांना लोकांनी बळी पडू नये असे आवाहन नगरसेवक उमेश गायकवाड यांनी केले आहे.