पुणे: आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत रॉयल्स संघाने पीएचएम टायगर्स संघाचा सर्व 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत निपुन भंडारीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर रॉयल्स संघाने पीएचएम टायगर्स संघाचा सर्व 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना अक्षय ओकच्या 46 धावांसह पीएचएम टायगर्स संघाने 10 षटकात 3 बाद 86 धावा केल्या. 86 धावांचे लक्ष निपुन भंडारीच्या नाबाद 52 व सौरभ सानीच्या नाबाद 26 धावांसह रॉयल्स संघाने 5.2 षटकात एकही गडी न गमावता 87 धावा करून सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक पारितोषीक देण्यात आले. स्पर्धेचे पारितेषिक वितरण सेंट्रल काऊंसील मेंबर सीए चंद्रशेखर चितळे, माजी सेंट्रल काऊंसील मेंबर सीए झावरे, डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे विभागाच्या अध्यक्षा ऋता चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिजनल काऊंसील मेंबर सीए यशवंत कासार, सीए सुहास बोरा, अभय बोरा, सीए योगेश पोद्दार, सीए सुमेर शहा, सीए भुषण शहा, सीए सचिन परकाळे, सीए अल्पेश गुजराथी, सीए अमोल चंगेडीया, सीए अक्षय पुरंदरे, सीए आनंद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
पीएचएम टायगर्स- 10 षटकात 3 बाद 86 धावा(अक्षय ओक 46(22), सागर ढवळे 2-20) पराभूत वि रॉयल्स- 5.2 षटकात बिनबाद 87 धावा(निपुन भंडारी नाबाद 52(17), सौरभ सानी नाबाद 26(15)) सामनावीर- निपुन भंडारी
रॉयल्स संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.
इतर पारितोषिके
सर्वेत्कृष्ट फलंदाज- रुद्रांग बलसेकर
सर्वेत्कृष्ट गोलंदाज- आयुष तिवारी
मालीकावीर- साहिल पारख
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक – अक्षय ओक
सर्वेत्कृष्ट उदयोन्मुख खोळाडू- यश बोरा