पुणे: द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे प्रतिष्ठित द अ कॅम्पबेल ट्रॉफी क्लास- II चे आयोजन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आले होते. या लढतीत जय गोविंद स्टड आणि ॲग्री फार्म चे प्रतिनिधी किशोर.पी रुंग्ता,गौरव.के रुंग्ता, प्रीती सिंग, केआर दिग्विजय सिंग शेखावत यांच्या मालकीच्या प्युअर झिंक या घोड्याने १ मिनिट २३ सेकंद व ६६५ मिनीसेकंद वेळ नोंदवत १४०० मी शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला. याचा संतोष. जी रोडे हा जॉकी होता, तर अधिराजसिंग जोधा ट्रेनर होता.
सविस्तर निकाल: द अ कॅम्पबेल ट्रॉफी क्लास- II
विजेता: प्युअर झिंक
उपविजेता: मिसिंग यू