पुणे-आज रविवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या, ताडीवाला रोड भागात झालेल्या पदयात्रेस परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दुतर्फा जमलेल्या हजारो नागरिकांनी रमेश बागवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर काही ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
अनेक महिलांनी त्यांचे औक्षण केले. पदयात्रेदरम्यान नागरिक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या.
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी रमेश बागवे यांनाच आमदार पदी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
ताडीवाला रोड पदयात्रेस लुम्बिनी मंदिर येथून सायंकाळी प्रारंभ झाला, तेथून हनुमान मंदिर, मशिदी समोरील इंदिराविकास नगर, पान मळा येथील झोपडपट्टी पुनर्वसन इमारत, तसेच विविध गृहनिर्माण सोसायटी मार्गे शूरवीर मारुती मंदिर, उल्हास नगर, डिझेल कॉलनी मार्गे महात्मा फुले वसाहत, आल्हाट चौक, भाजी मार्केट, ते सोहराब हॉल, शेवटी कपिला डेअरी येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात
लताताई राजगुरू , प्रदीप गायकवाड मेहबूब नदाफ , राजीनीताई त्रिभुवन,सुजित यादव,राहुल तायडे ,मीराताई शिंदे , प्रकाश भालेराव, अणजू सोळंकी,हाजी नदाफ ,विनोद उबाळे, नितीन रोकडे, जामसुभाई शेख, हुसेन जमादार ,वळाप्पा भिंगारे ,गौतम कवाडे आदी यावेेेेळी उपस्थित होते.