पुणे-महापालिका पदाधिकारी यांनी खासदार गिरीश बापट अथवा भाजप शहराध्यक्ष यांच्या समवेत भाजप कार्यालयाच्या ठिकाणी होणार्या मुख्य आंदोलनात न येता आपापले वेगवेगळे आंदोलन केले .जे केवळ फोटो पुरते मर्यादित होते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी कसरत झाल्याचे स्पष्ट झाले . एकीकडे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वॉर रुम (डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती पाहण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्मार्ट सिटी सेंटरला भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहिलेले महापौर ..दुसरीकडे तेच महापौर ‘जनता मरणाच्या दारात ,सरकार मात्र घरात असे चित्र दिसले .या राजकीय कैचीत अडकलेल्या महापौरांनी आपली भूमिका मात्र उत्तमरीत्या साकारली
दुसरीकडे माजी महापौर असलेलेया आणि आता कसब्याच्या आमदार असलेल्या मुक्ता टिळक आणि शैलेश टिळक या दाम्पत्यांचे दर्शन या आंदोलनानिमित काही काळ कार्यकर्त्यांना झाले, नागरिक तर या वेळेत लॉक डाऊन मध्ये व्यस्त होते.एकीकडे महापौराची कसरत तर दुसरीकडे आमदार झालेल्या माजी महापौरांची तब्बेत बरी नसतांना आंदोलनास उपस्थित राहण्यास करावी लागलेली कसरत या दोन गोष्टी या आंदोलनाच्या वैशिष्ट्य ठरल्या.