पुणे-
NRC व CAA या कायद्याला विरोध करण्यासाठी आज पुणे शहरात पुणे शहर माजी महापौर संघटनेतर्फे सिटी पोस्ट चौकात खासदार सौ वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी महापौरांनी धरणे आंदोलन केले या वेळी बोलताना माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, दत्ताभाऊ एकबोटे विठ्ठलराव लडकत,बाळासाहेब शिवरकर,सुरेश शेवाळे,प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, सौ कमल व्यवहारे,सौ दीप्ती चवधरी, सौ रजनी त्रिभुवन,अभय छाजेड इत्यादींनी या कायद्याविषयी माहिती नागरिकांना दिली यामुळे देशातील नागरिकांचे किती नुकसान होणार आहे हे दाखवून दिले किंवा हा कायदा होणार नाही याची दक्षता सर्व भारतीय नागरिकांनी घ्यायला हवी आणि त्यासाठी जनआंदोलन उभे केले पाहिजे असे आग्रहपूर्वक मांडले 13 माजी महापौरांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.